काही नाती क्षणांची... काही काळाची
काही नाती रक्ताची... काही बिनरक्ताची
काही मैत्रीची...काही प्रेमाची
काही मनांनी जोडलेली... काही नशिबाने बांधलेली
काही हवीहवीशी वाटणारी... काही नकोशी झालेली
असच असत एक नात ....एका वळणावर भेटलेलं
सहजच जुळलेलं ...मनाशी जोडलेलं
खूप जवळच वाटणार... तरीही दूर राहिलेलं
एक नात बिननावाच ...काळाच्या ओघात पुसट होणार
अन मनात कायम घर करून जाणार ...
कोमल ............................१८/५/११
सहजच जुळलेलं ...मनाशी जोडलेलं
ReplyDeleteखूप जवळच वाटणार... तरीही दूर राहिलेलं
manala bhavun gelya hya oli
सहजच जुळलेलं ..मनाशी जोडलेलं
ReplyDeleteखुप जवळच वाटणार...तरीही दुर राहिलेलं ह्या आळीं मधल नात कोणतं त्या नात्याचे नाव काय? कविता खुप छान आहे हृदयाला स्पर्शून जाते
कविता खुप सुंदर आहे हृदयाला स्पर्शून जाते पण एकि मनात प्रश्न पडतो तो म्हणजे सहजच जुळलेलं... मनाशी जोडलेलं खुप जवळच वाटणार तरीही दुरराहिलेलं एक नात बिननावाच काळाच्या ओघात पुसट होणार अन् मनांत कायम घर करुन जाणार नात ह्या नात्याच नाव काय हे सांगाल का?
ReplyDelete