वाटेतल्या अनंत अडचणींना तोंड मी देत गेले
काट्यांनी भरलेला रस्ता अनवाणीच तुडवत गेले
पण फुलांनी भरलेला मार्ग दुसर्यांसाठी सोडत गेले
वादळालाही थोपवेल अशीच भिंत उभारत गेले
जखमी हृदयाचे रक्ताळलेले घाव जपत गेले
पण दुसर्यांच्या दुःखाला हास्याचे मलम लावत गेले
माझ्या अश्रूंनी भरलेले डोळे मी नेहमीच लपवत गेले
ओंजळीत जपलेल्या आठवणींना अशीच सांडत गेले
पण दुसर्यांच्या आसवांना पुसायला नेहमीच पुढे गेले
आयुष्याच्या वाटेवर असे वळण अनेक आले
कधी सुखाचे तर कधी दुःखाचे क्षणही त्यात वाहून गेले
पण सगळ्यांनाच जपताना मात्र मी न माझी राहिले
कोमल .................................१६/७/१०
No comments:
Post a Comment