हरवलेले शब्द काही सापडत नाही
मनातल्या भावना काही उतरत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...
आभाळ आता पूर्वी सारखं भरत नाही
मनातला पाऊस दाटत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...
वाटेवरच धुकं हटत नाही
मनातलं मळभ सरत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...
नभातला चंद्र आता हसत नाही
मनातलं चांदणहि आता पसरत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...
तुझ्यातली मी आता दिसत नाही
माझ्यातला तू आता लपत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...
मनातलं गुपित आता बोलत नाही
ओठांवर हसू आता आणत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...
विचारांचे कोडे उलगडत नाही
नात्यांचा गुंता काही सुटत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...
कोमल ..........................५/७/१०
No comments:
Post a Comment