Total Pageviews

33549

Sunday, October 31, 2010

मी पुन्हा येतेय ...

मी पुन्हा येतेय ...
जुन्या आठवणींना कोंडून
नव्या आठवणी जपायला

मी पुन्हा येतेय ...
रोजच्याच वाटा टाळून
नव्या वाटा शोधायला

मी पुन्हा येतेय ...
वेड्या आसवांना पुसून
मनापासून हसवायला

मी पुन्हा येतेय ...
मौनाला विश्रांती देऊन
शब्दांना मांडायला

मी पुन्हा येतेय ...
भासांना दूर करून
स्वतःला शोधायला

मी पुन्हा येतेय ...
अंधाराला दूर सारून
नव्या दिशा उजळायला

मी पुन्हा येतेय ...
जुन्या गोष्टी विसरून
नवी सुरवात करायला

मी !! तीच आधीचीच
पण पुन्हा येतेय नव्याने ....

कोमल .....................................३१/१०/१०

No comments:

Post a Comment