Total Pageviews

33547

Sunday, October 31, 2010

कधीतरी असंही जगावं ...

कधीतरी उगाच वेड्यागत वागावं
कधी चुकांवर तर कधी स्वतःवरच हसावं

कधीतरी आठवांच्या ओंजळीला रिकामं करावं
अन जरा स्वतःसोबत निवांत बसावं

कधीतरी शब्दांना मनातच कोंडाव
जमल तर सगळ्यांशी मौनातच बोलाव

कधीतरी आपल्या सावलीपासूनही शिकावं
कधी लहान तर कधी मोठ होऊन जगावं

कधीतरी त्या आभाळासारखं वागावं
कोरड राहून दुसऱ्यावर मनसोक्त बरसावं

कधीतरी त्या झाडासारख जगावं
उन्हात उभे राहून दुसर्यांना सावली द्यावं

कधीतरी त्या रंगीत फुलपाखरासारख जगावं
क्षणभर आयुष्यातही दुसर्यांना हसवावं

कधीतरी त्या चांदण्यानप्रमाणे रहावं
अंधारातही हक्काने सोबत करावं

कोमल ...................................३१/१०/१०

No comments:

Post a Comment