कोसळताहेत मुग्ध सरी
जणू आभाळ फाटलंय कुठेतरी
सुटलाय गार गार वारा
भिजून गेली तृषार्त धरा
*******************
अशाच एका पावसाळी
भेट तुझी माझी झाली
स्मरल्या त्या आठवणी
आज पुन्हा भिजताना अशाच क्षणी
********************
आल्या या सरी
अशाच माझ्या दारी
अंगणसुद्धा भरले
फक्त त्यांच्या सुगंधाने
*******************
आताशा पावसात भिजण
सोडलंय मी
उगाच त्यात अश्रू लपवण
टाळतेय मी
*******************
नको म्हणतानाही
तो आला
अन मलाही त्यासोबत
भिजवून गेला
*******************
आपली ती जागा
आता एकाकी उरलीय
रोजच्या पावसात
एकटीच भिजतेय
*******************
कोसळल्या सरी आज पुन्हा
जागवल्या आठवणी जुन्या
अशाच पावसात भिजलेल्या
आणि नंतर त्यात वाहून गेलेल्या
********************
मी नाही पुन्हा पावसात जाणार
उगाच त्यात नाही भिजणार
कारण फक्त एवढेच मला
पुन्हा तुझी मग आठवण छळणार
********************
तुझ्या माझ्या नात्यात आता
अंतर वाढत चाललाय
जसा हा पाऊसही आता
हुलकावणी देतोय
********************
आभाळ भरून आल कि
मन माझ अस्वस्थ होत
तू सोबत नसल्याची
उगाच जाणीव करून जात
कोमल ...........................६/६/१०
No comments:
Post a Comment