दुसऱ्यांना हसवण्यासाठी
स्वतःचे दुःख लपवावे लागते
कधी त्यांचे अश्रू पुसण्यासाठी
आपल्यालाही त्यात भिजावे लागते
त्यांना सांभाळण्यासाठी
आपल्याला खंबीर व्हावे लागते
कधी त्यांचे मन जपण्यासाठी
आपल्या मनाला सावरावे लागते
त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी
आपले स्वप्न विसरावे लागते
त्यांना समजून घेण्यासाठी
कधी लहान तर कधी मोठे व्हावे लागते
तर कधी त्यांचे अस्तित्व जपण्यासाठी
आपल्याला स्वतःलाच विसरावे लागते
कोमल ......................४/६/१०
No comments:
Post a Comment