चिमुटभर सुखाला जवळ करून बघ
कोसळणाऱ्या दुःखाला जरा आधार देऊन बघ
दाटलेल्या कंठाला मोकळ करून बघ
मिटलेल्या पापण्यांना जरा उघडून बघ
सांडणाऱ्या आसवांना बांध घालून बघ
न जुळलेल्या नात्याला जरा जोडून बघ
विचारांच्या गुंत्याला उलगडून बघ
छळणार्या आठवणींना जरा दूर लोटून बघ
निराशेत जाणाऱ्या तोलाला सावरून बघ
मृगजळामागे पळणाऱ्या मनाला जरा आवरून बघ
भरलेल्या आभाळात कधी तरी भिजून बघ
वळणावर कधी दिसले तर निदान एकदा वळून बघ
कोमल .....................................७/८/१०
No comments:
Post a Comment