Total Pageviews

33563

Monday, August 2, 2010

मी अन तो

मी झुळूक हलकीशी ..........तो बेभान वारा

मी श्रावणातल्या सरी.........तो पाऊस कोसळणारा

मी कळी उमलणारी...........तो काटा बोचणारा

मी कोर चंद्राची.................तो अंधार दाटणारा

मी ज्योत तेवणारी ..........तो प्रकाश पसरवणारा

मी आसव लपवणारी .......तो मोती वेचणारा

मी मंद हासणारी..............तो खळाळता झरा

मी स्वप्न जगणारी ..........तो वास्तव जाणणारा

मी मुक्त उडणारी .............तो तोल सावरणारा

मी रेख पुसटशी ..............तो समतोल साधणारा

मी अपूर्ण जराशी ...........तो पूर्णत्व देणारा

कोमल .......................२/८/१०

1 comment: