बघ ना रे सख्या !!
हा खट्याळ वारा मज खुणावे
तुझ्या प्रीतीचा हळुवार स्पर्श दावे
सांग ना रे त्याला नको छळूस मजला असा
उरी दाटलेला भाव उफाळून यावा जसा
बघ ना रे सख्या !!
हे आभाळ बघ कसे दाटले
जसे तुझ्या आठवणींने नयन माझे भरले
सांग ना रे त्याला नको असे दाटून येऊस
माझ्या आसवांना बरसण्याचा नको अजून एक बहाणा देऊस
बघ ना रे सख्या !!
हा अल्लड पाऊस कसा खुणावतो
नकळत तुझ्या आठवणीने भिजवतो
सांग ना रे त्याला नको बरसू असा
माझ्या दाटलेल्या नयनांना मोकळ करावा जसा
बघ ना रे सख्या !!
तो चंद्रही मजकडे पाहून हसतो
माझ्या हास्याला तोही आता तरसतो
सांग ना रे त्याला नको असा पाहून हसू
माझ्या डोळ्यात आता उरलेत फक्त अन फक्त आसू
कोमल ....................................२३/८/१०
No comments:
Post a Comment