वाट रोजची तरीही
आजच कशी चुकले मी
ओळखीच्या चेहऱ्यांनाही
आजच कशी विसरले मी
अंधार रोजचा तरीही
आजच कशी घाबरले मी
आवाज रोजचा तरीही
आजच कशी गोंधळले मी
वेदना रोजची तरीही
आजच कशी कळवळली मी
आठवणी रोजच्या तरीही
आजच कशा सांडल्या मी
माणसांचा गोतावळा तरीही
आजच कशी गर्दीत एकटी मी
कोमल ............................३०/८/१०
No comments:
Post a Comment