रात्रभर जागून मी सिनेमा पाहतो
कधी कधी उशिरा पर्यंत दारूकामहि करतो
पण वेळेवर ऑफिस गाठण कधी जमलंच नाही
काय करणार, आळस माझ्या अंगातून जातच नाही !!
खडूस बॉसच्या नावाने शंख मी करतो
पगार वेळेवर झाला नाही कि वाद मी घालतो
पण वेळेवर काम पूर्ण करण मला कधी जमलंच नाही
काय करणार, आळस माझ्या अंगातून जातच नाही !!
रस्त्यावरच्या खड्यांना रोज मी चुकवत असतो
सरकारला त्यासाठी मी जबाबदार धरतो
पण कचरा कधी मी कचराकुंडीत फेकलाच नाही
काय करणार, आळस माझ्या अंगातून जातच नाही !!
राजकारणावर मी मनसोक्त गप्पा मारतो
भ्रष्ट नेत्यांना शिव्याची लाखोली वाहतो
पण मतदान वेळेवर करण मला कधी जमलंच नाही
काय करणार, आळस माझ्या अंगातून जातच नाही !!
कोमल ..........................१८/८/१०
No comments:
Post a Comment