Total Pageviews

33499

Tuesday, August 24, 2010

मी न जाणले कधी हे सारे घडून गेले .....

मी न जाणले कधी हे सारे घडून गेले .....
शहाणांच्या दुनियेत मज मूर्ख ठरवले गेले ....

माझ्या मौनाला नवे अर्थ दिले गेले ....
मुक्या शब्दांनाही नाना छेद दिले गेले .....

अबोल भावनांना पायी तुडवले गेले ......
झोपेचे सोंग घेऊन मज फसवून गेले ........

फसव्या मुखवट्यानच्या आड हसवून गेले ......
आसवांना माझ्या खोटे ठरवून गेले ......

खोटे सारे वादे हवेत विरून गेले ......
माझ्या विश्वासाला तडे देऊन गेले ......

प्रीतीला माझ्या वेडे ठरवून गेले .......
गर्दीत माझे अस्तित्व हरवून गेले ......

मी न जाणले कधी हे सारे घडून गेले .....
माझ्याही नकळत मज मूर्ख बनवून गेले ......

कोमल ........................................२४/८/१०

No comments:

Post a Comment