Total Pageviews

Sunday, October 31, 2010

मी पुन्हा येतेय ...

मी पुन्हा येतेय ...
जुन्या आठवणींना कोंडून
नव्या आठवणी जपायला

मी पुन्हा येतेय ...
रोजच्याच वाटा टाळून
नव्या वाटा शोधायला

मी पुन्हा येतेय ...
वेड्या आसवांना पुसून
मनापासून हसवायला

मी पुन्हा येतेय ...
मौनाला विश्रांती देऊन
शब्दांना मांडायला

मी पुन्हा येतेय ...
भासांना दूर करून
स्वतःला शोधायला

मी पुन्हा येतेय ...
अंधाराला दूर सारून
नव्या दिशा उजळायला

मी पुन्हा येतेय ...
जुन्या गोष्टी विसरून
नवी सुरवात करायला

मी !! तीच आधीचीच
पण पुन्हा येतेय नव्याने ....

कोमल .....................................३१/१०/१०

कधीतरी असंही जगावं ...

कधीतरी उगाच वेड्यागत वागावं
कधी चुकांवर तर कधी स्वतःवरच हसावं

कधीतरी आठवांच्या ओंजळीला रिकामं करावं
अन जरा स्वतःसोबत निवांत बसावं

कधीतरी शब्दांना मनातच कोंडाव
जमल तर सगळ्यांशी मौनातच बोलाव

कधीतरी आपल्या सावलीपासूनही शिकावं
कधी लहान तर कधी मोठ होऊन जगावं

कधीतरी त्या आभाळासारखं वागावं
कोरड राहून दुसऱ्यावर मनसोक्त बरसावं

कधीतरी त्या झाडासारख जगावं
उन्हात उभे राहून दुसर्यांना सावली द्यावं

कधीतरी त्या रंगीत फुलपाखरासारख जगावं
क्षणभर आयुष्यातही दुसर्यांना हसवावं

कधीतरी त्या चांदण्यानप्रमाणे रहावं
अंधारातही हक्काने सोबत करावं

कोमल ...................................३१/१०/१०

Sunday, October 24, 2010

तू एक ...

तू एक स्वप्न .........त्या चांदरातीतला
नेहमीच अर्धवट राहणारा

तू एक कोडे .............न उलगडलेला
शोधूनही न सापडणारा

तू एक अश्रू ..............न विरघळलेला
पावसातही अस्तित्व दाखवणारा

तू एक हास्य ...........न खुललेला
समजूनही न उमजणारा

तू एक पथिक ...........वाट चुकलेला
क्षणभर विश्रांती घेणारा

तू एक नाव ..............दिशा भरकटलेला
उगाच सुखाच्या शोधात फिरणारा

कोमल ..........................................२५/१०/१०

Sunday, October 17, 2010

वेदना

ते स्वरही माझेच होते
जे गीत तुझे कधी गायले होते

ते शब्दही माझेच होते
जे तुझ्या कंठात दाटले होते

ते अश्रूही माझेच होते
जे तुझ्या नयनातून सांडले होते

ते क्षणही माझेच होते
जे तुझ्या आठवत राहिले होते

ते स्पर्शही माझेच होते
जे कधी तुला आपलेसे वाटले होते

आज सारे काही तुझे - माझे झाले होते
जे कधीतरी फक्त आपले होते

कोमल ....................................१७/१०/१०

Monday, October 4, 2010

एकांत ...

टाळते आताशा मी वाट अंधाराची
नकोशी आता मज साथ चांदण्यांची ...

उगाच फाडते मी पान आठवणींची
जाळते उगाच मज याद आसवांची ...

दूर सारते मी वाट हि धुक्याची
मोकळीक हवी मज श्वास घेण्याची ...

सांडली मी झोळी अनमोल आठवांची
उरलीत मजजवळ वेदना बोचणाऱ्या काट्यांची ...

गाळली काही मी कडवी अबोल शब्दांची
करू देत मज जरा संवाद माझ्याच मनाशी ...

कोमल .............................................४/१०/१०

Friday, October 1, 2010

तुझ्या अहंकारात मीच जळत होते ...

प्रश्न तर साधेच मी विचारले होते
पण उत्तर द्यायचे तेव्हाही तू टाळले होते ...
का माझे शब्द तुला टोचले होते ?
का त्यांचे घाव वर्मी लागले होते ?

सांग !! मी कुठे चुकले होते
का अश्रू माझे फसवे होते ...
अंधार तर दूर मी सारत होते
वाटेतले काटेही वेचत होते ...

तुझ्या शब्दांनी घायाळ होत होते
तुझ्या आसवात चिंब भिजत होते ...
उगाचच तुला हसवत होते
अन त्याची किंमत मीच मोजत होते ...

संवादाची जागा आज तुझे मौन घेत होते
नकळत आपल्यातले अंतर वाढवत होते ...
पण तू तर कधी जाणलेच नाही रे !!
तुझ्या अहंकारात मीच जळत होते ...

कोमल ................................१/१० /१०