Total Pageviews

Friday, October 1, 2010

तुझ्या अहंकारात मीच जळत होते ...

प्रश्न तर साधेच मी विचारले होते
पण उत्तर द्यायचे तेव्हाही तू टाळले होते ...
का माझे शब्द तुला टोचले होते ?
का त्यांचे घाव वर्मी लागले होते ?

सांग !! मी कुठे चुकले होते
का अश्रू माझे फसवे होते ...
अंधार तर दूर मी सारत होते
वाटेतले काटेही वेचत होते ...

तुझ्या शब्दांनी घायाळ होत होते
तुझ्या आसवात चिंब भिजत होते ...
उगाचच तुला हसवत होते
अन त्याची किंमत मीच मोजत होते ...

संवादाची जागा आज तुझे मौन घेत होते
नकळत आपल्यातले अंतर वाढवत होते ...
पण तू तर कधी जाणलेच नाही रे !!
तुझ्या अहंकारात मीच जळत होते ...

कोमल ................................१/१० /१०

No comments:

Post a Comment