Total Pageviews

Wednesday, July 28, 2010

रोज रोज तीच ती........

रोज रोज तीच ती
रोजचीच तीच मी
रोजचाच तो क्षण
रोजचीच आठवण
रोज रोज तेच ते
रोज तेच साहते
रोजचीच ती नजर
रोजचाच तो प्रहर
रोज मला जाळते
रोजच मला छळते
रोजचाच भावनांचा मेळ
रोज घडतो अश्रूंचा खेळ
रोज ती प्रीत खोल
रोजचीच राहते अबोल
रोज त्याच असच येण
रोजच त्याच नकळत जाण
रोज रोज हीच कथा
रोजचीच हि व्यथा
रोज रोज मांडते
रोजच आठवणी सांडते

कोमल ......................२९/७/१०

Friday, July 23, 2010

तो काल असाच बरसला ......

तो काल असाच बरसला ......

मनातल आभाळ
दाटून गेला ....

आठवणींच्या पानांना
भिजवून गेला ...

नकळत आसवांना
लपवून गेला ...

विचारांच्या धाग्यांना
गुंतवून गेला ...

ओंजळीतील स्वप्नांना
सांडून गेला ....

डोळ्यातले भाव
सांगून गेला ...

प्रीतीचे प्रतिबिंब
दाखवून गेला ....

तो अन हा वेडा पाऊस ....

कोमल .....................२४/७/१०

Thursday, July 22, 2010

अपूर्ण मी

पूर्णत्वाचा शोध घेत
फिरत होते मी

अंधाऱ्या वाटेत
चाचपडत होते मी

नात्यांचा गुंता
सोडवत होते मी

विचारांची कोडी
उलगडत होते मी

स्वप्नांचे पंख
छाटत होते मी

मनाचा बांध पुन्हा
सावरत होते मी

हरवलेल्या वाटांना
शोधत होते मी

आठवणींचा धागा पुन्हा
सांधत होते मी

आयुष्याच्या वर्तुळात
स्वत्व शोधत होते मी

सारे मिळूनही हरवले
आहे काहीतरी मी

तरीही अपूर्ण आहे
तुझ्याशिवाय मी

कोमल ........................२३/७/१०

तो असाच येतो...

तो असाच येतो
अन अचानक कोसळतो
कोरड्या मनाला चिंब भिजवतो ...

तो असाच येतो
अन दाटून येतो
माझ्या आसवांना त्याच्यात लपवतो ...

तो असाच येतो
अन मनसोक्त भिजवतो
मनाची मरगळ दूर करतो ...

तो असाच येतो
अन कवेत घेतो
मला त्याच्या मिठीत सामावतो ...

तो असाच येतो अचानक ...
तोच तो पाउस अन त्याच्या आठवणी ....

कोमल .....................२२/७/१०

Friday, July 16, 2010

भास तुझा......

भास श्वासांचा
भास शब्दांचा
भास तुझा माझ्या
आठवणीत असण्याचा ....

भास प्रेमाचा
भास मैत्रीचा
भास तुझा माझ्या
विचारात असण्याचा ....

भास अंतराचा
भास स्पंदनाचा
भास तुझा माझ्या
मिठीत असण्याचा ....

भास वचनाचा
भास विश्वासाचा
भास तुझा माझ्या
प्रत्येक शब्दाला जागण्याचा....

भास निरागसतेचा
भास हळवेपणाचा
भास तुझा माझ्या
सोबत असण्याचा .....

कोमल ...........................१६/७/१०

Thursday, July 15, 2010

मी न माझी राहिले......

वाटेतल्या अनंत अडचणींना तोंड मी देत गेले
काट्यांनी भरलेला रस्ता अनवाणीच तुडवत गेले
पण फुलांनी भरलेला मार्ग दुसर्यांसाठी सोडत गेले

वादळालाही थोपवेल अशीच भिंत उभारत गेले
जखमी हृदयाचे रक्ताळलेले घाव जपत गेले
पण दुसर्यांच्या दुःखाला हास्याचे मलम लावत गेले

माझ्या अश्रूंनी भरलेले डोळे मी नेहमीच लपवत गेले
ओंजळीत जपलेल्या आठवणींना अशीच सांडत गेले
पण दुसर्यांच्या आसवांना पुसायला नेहमीच पुढे गेले

आयुष्याच्या वाटेवर असे वळण अनेक आले
कधी सुखाचे तर कधी दुःखाचे क्षणही त्यात वाहून गेले
पण सगळ्यांनाच जपताना मात्र मी न माझी राहिले

कोमल .................................१६/७/१०

Monday, July 12, 2010

आठवण तुझी....

चांदण्यात लपलेली रात्र खुलावी जशी
तशीच उजळली आज आठवण तुझी

पावसात भिजलेली हिरवळ जशी
तशीच हळवी सख्या आठवण तुझी

दडलेल्या पानातून कळी उमलावी जशी
तशीच फुलते प्रिया आठवण तुझी

आभाळाच्या पडद्यावर चित्र रंगवावी जशी
तशीच खुलून येते सख्या आठवण तुझी

लाजणाऱ्या त्या चंद्रात उजळते रात्र जशी
तशीच लाजते प्रिया आठवण तुझी

मिटलेल्या पापण्यात लपती आसव जशी
तशीच भिजवते सख्या आठवण तुझी

कोमल ......................१३/७/१०

सांगू कशी तुला ....

मनातली तगमग सांगू कशी प्रिया ...
प्रीत हि खरी खुरी दाखवू कशी तुला .....

नयनातील आसव लपवू कशी प्रिया ....
हृदयाची स्पंदन ऐकवू कशी तुला ....

मौनाची भाषाही कधीतरी समजून घे प्रिया ...
अबोल प्रीत माझी कधी कळली नाही का तुला ....

दवासारखी माझी प्रीत क्षणिक नाही प्रिया ...
आयुष्यभराच्यासाथीच वचन आहे तुला ....

मिटलेल्या पापण्यांमध्ये तुझेच चित्र प्रिया ....
स्वप्नांमध्येही नित्य पाहते तुला....

पुरे हा आता रोजचा लपंडाव प्रिया ...
शब्दातल्या भावना अजून कळल्या नाहीत का तुला ....

सांग बरे आता कसे सावरू वेड्या मनाला प्रिया
मनातली तगमग आता सांगू कशी तुला ....

कोमल .............................१३/७/१०

Sunday, July 11, 2010

मी पुन्हा भेटेन ....

मी पुन्हा भेटेन ....
त्याच जुन्या वळणावर
नव्या वाटा शोधताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेधुंद वाऱ्यासोबत
काळाशी स्पर्धा करताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच बेफान लाटांसोबत
आकाशाला गवसणी घालताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हसणाऱ्या फुलांसोबत
आनंदाचे साम्राज्य पसरवताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच तळपणाऱ्या सूर्यासोबत
नव्याने तेजस्वी होताना

मी पुन्हा भेटेन ....
त्याच हळव्या आठवणींमधून
नकळत पावसासोबत बरसताना

कोमल................११/७/१०

Saturday, July 10, 2010

जा तू अशीच.......

जा तू अशीच जा सामोरी
उभी का अशी पाठमोरी ....

घाबरू नकोस अशी अंधाराला
कर जवळ त्या प्रकाशाला ....

कर मोकळ आकाश सारे
वाहू देत तुझ्या शब्दांचे वारे ....

का बांधतेस तू भावनांना
वाहू देत कधीतरी आसवांना .....

दाटलेला अंधार हा दोन क्षणांचा
उजळूदे प्रकाश तुझ्या स्वाभिमानाचा ......

कोमल ....................१०/७/१०

आता पुन्हा जगावस वाटत नाही..

वाटेतला अंधार सरत नाही
आता चांदण्याही साथ देत नाही
मनातलं धुकं आता विरत नाही
आता पुन्हा जगावस वाटत नाही

उगाच जास्त बोलत नाही
मनातलं गुपित खोलत नाही
चेहऱ्यावर हसू आता दिसत नाही
आता पुन्हा जगावस वाटत नाही

उगाच सुखाची व्याख्या जुळवत नाही
दुःखालाही सोबत घेत नाही
विनाकारण आता प्रश्न पडत नाही
आता पुन्हा जगावस वाटत नाही

स्वप्न आता पूर्वीसारखी पडत नाही
चित्रही आता रंगत नाही
उगाच फुलांचा सुगंध शोधत नाही
आता पुन्हा जगावस वाटत नाही

कोमल .......................१०/७/१०

Monday, July 5, 2010

हल्ली कविताच सुचत नाही...

हरवलेले शब्द काही सापडत नाही
मनातल्या भावना काही उतरत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...

आभाळ आता पूर्वी सारखं भरत नाही
मनातला पाऊस दाटत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...

वाटेवरच धुकं हटत नाही
मनातलं मळभ सरत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...

नभातला चंद्र आता हसत नाही
मनातलं चांदणहि आता पसरत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...

तुझ्यातली मी आता दिसत नाही
माझ्यातला तू आता लपत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...

मनातलं गुपित आता बोलत नाही
ओठांवर हसू आता आणत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...

विचारांचे कोडे उलगडत नाही
नात्यांचा गुंता काही सुटत नाही
हल्ली कविताच सुचत नाही...

कोमल ..........................५/७/१०

हो कदाचित तोच असेल...

हो कदाचित तोच असेल..
उगाच मनाला स्पर्शून गेला
अंग अंग शहारून गेला
तो बेधुंद वारा .....हो कदाचित तोच असेल

जुन्या आठवणी भिजवून गेला
उगाच मनात दाटून गेला
तो वेडा पाऊस..... हो कदाचित तोच असेल

सावलीही नाहीशी करून गेला
भीतीला दाट करून गेला
तो गर्द अंधार ......हो कदाचित तोच असेल

नभात अचानक डोकावून गेला
अंधार सारा निवळून गेला
तो लाजरा चंद्र ......हो कदाचित तोच असेल

उगाच मनात दाटून गेला
नात्यांना अस गुंतवून गेला
तो तुझाच विचार ......हो कदाचित तोच असेल

कोमल .......................५/७/१०

Friday, July 2, 2010

खरंच का सुख विकत मिळते ?

खरंच का सुख विकत मिळते ?
मग मलाही एक आण्याच दयानं....

खरंच का ते मागून मिळते ?
मग थोड मूठभर मलाही दयानं....

खरंच का ते क्षणभर असत ?
मग माझे क्षण थोडे वाढवून दयानं ....

खरंच का ते वाटेत सांडत ?
मग माझी ओंजळ थोडी शिवून दयानं ....

खरंच का ते नशिबात लिहिलेलं असत ?
मग एकदा माझं नशिब बदलून दयानं ....

कोमल ..........................२/७/१०