Total Pageviews

Tuesday, August 31, 2010

किती......

किती रिचवले प्याले
त्याला मोजमाप नाही
किती अश्रू गाळले
त्याला किंमत नाही
;
;
किती मार्ग धुंडाळले
त्याला तोड नाही
किती शब्द शोधले
त्याला अर्थ नाही
;
;
किती उत्तर शोधले
त्याला प्रश्नच नाही
किती श्वास रोखले
त्याला आता बधत नाही
;
तू जाण्याने आता कशालाच
किंमत उरली नाही

कोमल .................................३१/८/१०

रिते......

रिते आभाळ सारे
चिंब करुनी गेले
कोरड्या पापण्यात
अश्रू भरून गेले

रिते शब्द सारे
उरात दाटून गेले
मूक भावनांना
वाट देऊन गेले

रिते मार्ग सारे
अंधारात गडद झाले
रोजचे तरीही आज
अनोळखी होऊन गेले

रिते मन माझे
निशब्द जाहले
शब्दांच्या गर्दीतही
अव्यक्त होऊन गेले

कोमल ....................................३१/८/१०

Monday, August 30, 2010

गर्दीत एकटी मी....

वाट रोजची तरीही
आजच कशी चुकले मी

ओळखीच्या चेहऱ्यांनाही
आजच कशी विसरले मी

अंधार रोजचा तरीही
आजच कशी घाबरले मी

आवाज रोजचा तरीही
आजच कशी गोंधळले मी

वेदना रोजची तरीही
आजच कशी कळवळली मी

आठवणी रोजच्या तरीही
आजच कशा सांडल्या मी

माणसांचा गोतावळा तरीही
आजच कशी गर्दीत एकटी मी

कोमल ............................३०/८/१०

Saturday, August 28, 2010

मुक्त...

मुक्त मी
मुक्त तू
मुक्त मम भावना

मुक्त विचार
मुक्त आचार
मुक्त मम वेदना

मुक्त गीत
मुक्त संगीत
मुक्त मम संवेदना

मुक्त श्वास
मुक्त भास
मुक्त मम यातना

कोमल .............................२९/८/१०

Friday, August 27, 2010

आळस माझ्या अंगातून जातच नाही....

रात्रभर जागून मी सिनेमा पाहतो
कधी कधी उशिरा पर्यंत दारूकामहि करतो
पण वेळेवर ऑफिस गाठण कधी जमलंच नाही
काय करणार, आळस माझ्या अंगातून जातच नाही !!

खडूस बॉसच्या नावाने शंख मी करतो
पगार वेळेवर झाला नाही कि वाद मी घालतो
पण वेळेवर काम पूर्ण करण मला कधी जमलंच नाही
काय करणार, आळस माझ्या अंगातून जातच नाही !!

रस्त्यावरच्या खड्यांना रोज मी चुकवत असतो
सरकारला त्यासाठी मी जबाबदार धरतो
पण कचरा कधी मी कचराकुंडीत फेकलाच नाही
काय करणार, आळस माझ्या अंगातून जातच नाही !!

राजकारणावर मी मनसोक्त गप्पा मारतो
भ्रष्ट नेत्यांना शिव्याची लाखोली वाहतो
पण मतदान वेळेवर करण मला कधी जमलंच नाही
काय करणार, आळस माझ्या अंगातून जातच नाही !!

कोमल ..........................१८/८/१०

अरे माणसा !! जागा हो...

अरे माणसा !! जागा हो...
तू विसरलेल्या कर्तव्यासाठी
देलेले वचन पाळण्यासाठी
कधी हरवलेल्या नात्यांसाठी

अरे माणसा !! जागा हो...
भूतकाळाला गाडण्यासाठी
वर्तमानात जगण्यासाठी
कधी भविष्याची पहाट पाहण्यासाठी

अरे माणसा !! जागा हो...
माणुसकी जपण्यासाठी
अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी
कधी निरागस हास्य वाचवण्यासाठी

अरे माणसा !! जागा हो...
समाजाच रूप पालटण्यासाठी
भ्रष्ट राजकारणाला बदलण्यासाठी
कधी स्वतःच्याच अस्तित्वासाठी

कोमल ...............................२७/८/१०

मन ....

कोणाच्यातरी येण्याची वाट पाहत मन तिथेच घुटमळत
कधी अंधारात तर कधी वाटेतच अडखळत

कोणाच्यातरी आठवणीने मन उगाच भरून येत
कधी गर्दीत नकळत एकट करून जात

कोणाच्यातरी आवाजाचा मन कानोसा घेत
कधी शांततेतही उगाच आभास देत

कोणाच्यातरी आसवांनी मन भिजून जात
कधी तरी नकळतच पापण्यातून सांडून जात

कोणाच्यातरी बोलण्याने मन नकळत दुखावत
कधी तरी मौन सुद्धा केवढ त्रासदायक ठरत

कोणाच्यातरी विचारात मन हरवून जात
कधी स्वप्नात तर कधी जागेपणीच ते गुंतून जात

कोमल ............................२७/८/१०

Wednesday, August 25, 2010

न जाणले मी....

न जाणले मी शब्दातून व्यक्त होण
तुही न जाणलेस कधी माझं मौनातून बोलण

न जाणले मी कधी जखमांना दाखवण
तुही न जाणलेस त्यावर हळुवार फुंकर घालण

न जाणले मी कधी आसवांना वाट मोकळी करणं
तुही न जाणलेस कधी त्यांना स्वतःहून बांध घालण

न जाणले मी कधी अबोल भावनांना दर्शवण
तुही न जाणलेस कधी मुक्या प्रीतीला आपलंस करणं

न जाणले मी कधी तुझ्यात अस्तिव माझं हरवण
तुही न जाणलेस कधी माझ्या स्वप्नांना जपण

न जाणले कधी मी मागे वळून पाहण
तुही न जाणलेस कधी एखादी आर्त हाक देण

कोमल ...............................२५/८/१०

Tuesday, August 24, 2010

मी न जाणले कधी हे सारे घडून गेले .....

मी न जाणले कधी हे सारे घडून गेले .....
शहाणांच्या दुनियेत मज मूर्ख ठरवले गेले ....

माझ्या मौनाला नवे अर्थ दिले गेले ....
मुक्या शब्दांनाही नाना छेद दिले गेले .....

अबोल भावनांना पायी तुडवले गेले ......
झोपेचे सोंग घेऊन मज फसवून गेले ........

फसव्या मुखवट्यानच्या आड हसवून गेले ......
आसवांना माझ्या खोटे ठरवून गेले ......

खोटे सारे वादे हवेत विरून गेले ......
माझ्या विश्वासाला तडे देऊन गेले ......

प्रीतीला माझ्या वेडे ठरवून गेले .......
गर्दीत माझे अस्तित्व हरवून गेले ......

मी न जाणले कधी हे सारे घडून गेले .....
माझ्याही नकळत मज मूर्ख बनवून गेले ......

कोमल ........................................२४/८/१०

Monday, August 23, 2010

बघ ना रे सख्या !!

बघ ना रे सख्या !!
हा खट्याळ वारा मज खुणावे
तुझ्या प्रीतीचा हळुवार स्पर्श दावे
सांग ना रे त्याला नको छळूस मजला असा
उरी दाटलेला भाव उफाळून यावा जसा

बघ ना रे सख्या !!
हे आभाळ बघ कसे दाटले
जसे तुझ्या आठवणींने नयन माझे भरले
सांग ना रे त्याला नको असे दाटून येऊस
माझ्या आसवांना बरसण्याचा नको अजून एक बहाणा देऊस

बघ ना रे सख्या !!
हा अल्लड पाऊस कसा खुणावतो
नकळत तुझ्या आठवणीने भिजवतो
सांग ना रे त्याला नको बरसू असा
माझ्या दाटलेल्या नयनांना मोकळ करावा जसा

बघ ना रे सख्या !!
तो चंद्रही मजकडे पाहून हसतो
माझ्या हास्याला तोही आता तरसतो
सांग ना रे त्याला नको असा पाहून हसू
माझ्या डोळ्यात आता उरलेत फक्त अन फक्त आसू

कोमल ....................................२३/८/१०

Monday, August 16, 2010

कधी असंही करायचं असत ....

कमलपत्रावरील दवांना कधी धरायचं नसत
जे वाट बघतात आपली त्यांच्यासाठी थांबायचं असत

प्रत्येकवेळी मार्गातल्या काट्यांमुळे रडायचं नसत
वाटेतले अडथळे दूर सारून असंच पुढे चालायचं असत

येणाऱ्या संकटांना मुळीच घाबरायचं नसत
घोंगावणाऱ्या वादळालाही हिम्मतीने शमवायचं असत

हे माझ्याच नशिबी का अस कधी बोलायचं नसत
जे पडल आहे पदरात ते गोड मानून घ्यायचं असत

दिलेल्या वचनाला कधी मोडायचं नसत
घाबरलेल्या श्वासांना विश्वासाने जपायचं असत

ते तुझं हे माझं असं कधी करायचं नसत
दोघांनी मिळून एकमेकांना सावरायचं असत

कोमल ...........................१७/८/१०

Saturday, August 14, 2010

कधी मागितलं मी ....

कधी मागितला आयुष्याचा हिशोब मी
फक्त माझ्या शंभर प्रश्नांचे एक उत्तर तर मागितलं होत मी
निदान एकतरी इच्छा पूर्ण करायची होतीस ....

कधी मागितलं होत व्यापलेले आकाश मी
फक्त तुझ्या मुठभर हृदयात एक कोपराच तर मागितला मी
निदान तेवढी तरी हक्काची जागा द्यायची होतीस ....

कधी मागितले होते तुझे चोवीस तास मी
फक्त तुझ्या वेळेतील काही सेकंद तर मागितले होते मी
निदान तेवढा वेळ तरी काढायचा होतास ....

कधी मागितला होता बरसणारा पाऊस मी
फक्त तुझ्या आसवातील काही थेंब तर मागितले होते मी
निदान काही मोती तरी द्यायचे होतेस ....

कधी मागितला होता पसाभर फुलांचा सडा मी
फक्त तुझ्या काट्यानमधील एक पान तर मागितलं होत मी
निदान ओंजळभर तरी कळ्या द्यायच्या होत्यास ....

कधी मागितली होती नक्षत्राननी भरलेली रात मी
फक्त तुझ्या अंधारलेल्या वाटेवरल एक चांदण तर मागत होते मी
निदान एखादा काजवा तरी सोबत ठेवायचा होतास ....

कोमल ....................................१४/८/१०

Monday, August 9, 2010

सांग सखे ....का तू मज विसरून गेली ?

रात तू अशी विझवून गेली
हात तू माझा सोडून गेली
सांग सखे ....का तू मज विसरून गेली ?

प्रीत का माझी तोडून गेली
नाव का माझे खोडून गेली
सांग सखे ....का तू मज विसरून गेली ?

मार्ग का तू बदलून गेली
दिशा का माझ्या हरवून गेली
सांग सखे ....का तू मज विसरून गेली ?

आठवणीत का दाटून गेली
कंठ का माझा गहिवरून गेली
सांग सखे ....का तू मज विसरून गेली ?

स्वप्न का माझे तोडून गेली
डाव का माझा मोडून गेली
सांग सखे ....का तू मज विसरून गेली ?

श्वास का माझे गुदमरून गेली
हृदय का माझे पोखरून गेली
सांग सखे ....का तू मज विसरून गेली ?

कोमल ...............................९/८/१०

Sunday, August 8, 2010

मागीतलं नव्हत मी कधी....

मागीतलं नव्हत मी कधी
चंद्रासोबत चांदण.....
म्हणून अजूनही चाचपडतोय मी

मागीतलं नव्हत मी कधी
पावसासोबत गाण....
म्हणून कोरडाच राहिलो मी

मागीतलं नव्हत मी कधी
सूर्यासारख चमकण ....
म्हणून काजवाच जन्मलो मी

मागीतलं नव्हत मी कधी
फुलासारखं दरवळण ....
म्हणून काट्यानीच सजलो मी

मागीतलं नव्हत मी कधी
सागरासारख वाहण ....
म्हणून अजूनही झराच राहिलो मी

मागीतलं नव्हत मी कधी
प्रीतीत झुरण ....
म्हणून आजही एकटाच मी

मागीतलं नव्हत मी कधी
अजरामर जगण ....
म्हणून रोज कणाकणाने मरतोय मी

कोमल ..........................९/८/१०

.........ती एक अनामिक

ओढ जीवा लावून गेली
.........ती एक अनामिक
गंध नवा पसरवून गेली
.........ती एक अनामिक
तार स्पंदनाची छेडून गेली
.........ती एक अनामिक
गुलाबी हसू फुलवून गेली
.........ती एक अनामिक
सप्तरंग लेवून गेली
.........ती एक अनामिक
नजर माझी खिळवून गेली
.........ती एक अनामिक
श्वास माझे रोखून गेली
.........ती एक अनामिक
मन माझे गुंतवून गेली
.........ती एक अनामिक
झोप माझी उडवून गेली
.........ती एक अनामिक
विश्वच माझे उधळून गेली
.........ती एक अनामिक

कोमल ...............................८/८/१०

Saturday, August 7, 2010

कधीकधी असंही.........

भिजलेल्या आठवणींसोबत कधीतरी जगायचं असत
सगळ्यांना सोडून कधीतरी एकटच राहायचं असत
खोट्या विश्वासाने स्वतःलाच सावरायचं असत

तुटलेल्या मनाने मनसोक्त वावरायचं असत
कधी कोसळणाऱ्या सरीत अश्रूंना लपवायचं असत
कधी विषही गोड मानून संपवायचं असत

आलेल्या परिस्थितीला तोंड द्यायचं असत
दाटलेला हुंदक्याला तसंच धरून ठेवायचं असत
भरलेल्या पापण्यांना तसच मिटायच असत

कधी गालात तर कधी मनातच हसायचं असत
मनातल्या वादळाला तिथेच शमवायचं असत
विचारांच्या गुंत्याला हळुवार उलगडायचं असत

काही आठवणींना विसरायचं असत
आयुष्याच्या गर्दीत स्वतःला हरवायचं असत
आपल्याच सावली सोबत फक्त चालायचं असत

कोमल ..................................८/८/१०

जमल तर बघ !!

चिमुटभर सुखाला जवळ करून बघ
कोसळणाऱ्या दुःखाला जरा आधार देऊन बघ

दाटलेल्या कंठाला मोकळ करून बघ
मिटलेल्या पापण्यांना जरा उघडून बघ

सांडणाऱ्या आसवांना बांध घालून बघ
न जुळलेल्या नात्याला जरा जोडून बघ

विचारांच्या गुंत्याला उलगडून बघ
छळणार्या आठवणींना जरा दूर लोटून बघ

निराशेत जाणाऱ्या तोलाला सावरून बघ
मृगजळामागे पळणाऱ्या मनाला जरा आवरून बघ

भरलेल्या आभाळात कधी तरी भिजून बघ
वळणावर कधी दिसले तर निदान एकदा वळून बघ

कोमल .....................................७/८/१०

Friday, August 6, 2010

मी ......अन माझी सावली

विचारांच्या कोड्यात गुंगच राहते
कधी पुढे तर कधी पाठी पळते

हात दिल्यास थोडीशी दूर होते
कधी होते लहान तर कधी वाढत जाते

शब्दांच्या गुंत्यातही स्तब्धच राहते
कधी हसरी तर कधी रडवेली होते

मनातलं गुपित मनातच बोलते
कधी रुसते तर कधी अबोला धरते

अंधारात अचानक दिसेनाशी होते
कधी चांदण्यात तर कधी चंद्रात हासते

मी ......अन माझी सावली

कोमल ..................................७/८/१०

श्रावण.....

रंग रंगात रंगला श्रावण

नभ नभात उतरला श्रावण

पान पानात लपला श्रावण

फुल फुलात उमलला श्रावण

गंध गंधात दरवळला श्रावण

स्वर स्वरात गुणगुणला श्रावण

श्वास श्वासात गुंतला श्रावण

गीत गीतात गुंफला श्रावण

प्रीत प्रीतीत हरवला श्रावण

बंध बंधात बांधला श्रावण

मन मनात भरून उरला श्रावण

कोमल ...................................६/८/१०

हरवून गेले...

बदलत्या काळात
गाव माझे हरवून गेले

अनोळखी चेहऱ्यात
नाव माझे हरवून गेले

कोरड्या आसवात
भाव मनीचे हरवून गेले

पाषाण हृदयात
प्रेम माझे हरवून गेले

मिटलेल्या डोळ्यात
स्वप्न माझे हरवून गेले

विचारांच्या कोड्यात
शब्द माझे हरवून गेले

धाग्यांच्या गुंत्यात
नाते माझे हरवून गेले

खोट्या जगात
आयुष्य माझे हरवून गेले

कोमल ..................६/८/१०

Monday, August 2, 2010

मी अन तो

मी झुळूक हलकीशी ..........तो बेभान वारा

मी श्रावणातल्या सरी.........तो पाऊस कोसळणारा

मी कळी उमलणारी...........तो काटा बोचणारा

मी कोर चंद्राची.................तो अंधार दाटणारा

मी ज्योत तेवणारी ..........तो प्रकाश पसरवणारा

मी आसव लपवणारी .......तो मोती वेचणारा

मी मंद हासणारी..............तो खळाळता झरा

मी स्वप्न जगणारी ..........तो वास्तव जाणणारा

मी मुक्त उडणारी .............तो तोल सावरणारा

मी रेख पुसटशी ..............तो समतोल साधणारा

मी अपूर्ण जराशी ...........तो पूर्णत्व देणारा

कोमल .......................२/८/१०

सांगा कसे जगायचे ?

बुरसटलेल्या विचारात
बुडालेल्या समाजात
हरवलेल्या माणुसकीत
सांगा कसे जगायचे ?

गळक्या झोपडीत
फाटक्या कपड्यात
लपवलेल्या अब्रुत
सांगा कसे जगायचे ?

आभाळभर दुःखात
चिमुटभर सुखात
मानलेल्या समाधानात
सांगा कसे जगायचे ?

दुरावलेल्या नात्यात
अनोळखी चेहऱ्यात
खोट्या मुखवट्यात
सांगा कसे जगायचे ?

मोडलेल्या विश्वासात
कोमेजेल्या स्वप्नात
रुतलेल्या चिखलात
सांगा कसे जगायचे ?

कोमल ...........................२/८/१०

Sunday, August 1, 2010

सांग कशी जगू ?

सांग कशी जगू ?
श्वासांशिवाय...
ज्यात तुझा गंध सामावलाय

सांग कशी जगू ?
स्पंदनाशिवाय...
ज्यात तुझेच हृदय जपलंय

सांग कशी जगू ?
आठवणींशिवाय ...
ज्यात तूच भरून उरलाय

सांग कशी जगू ?
स्वरांशिवाय ....
जे तुझेच गीत गातंय

सांग कशी जगू ?
आसवानशिवाय ...
ज्यात तुझेच प्रतिबिंब दिसतंय

सांग कशी जगू ?
तुझ्याशिवाय ...
ज्यात माझ अस्तित्व लपलंय

कोमल ...................१/८/१०

आठवणींची वही.........

आठवणींची वही........... आज अचानक सापडली
काही पान कोरी ............ काही फाटलेली
उगाच चाळताना............जुनी पाने सापडली
त्यातच होती............. ...काही पाने दुमडलेली
अन काही......................मीच जाळलेली
पाहून त्यांना मति फक्त स्तब्ध झाली
पण डोळ्यात आसव पूर्वीसारखी नाही तराळली

कदाचित हेच..................जीवनाचे सत्य आहे
आयुष्याच्या वहीतली......पाने अशीच गळतात
कधी आठवांना तर.......... कधी मनाला जाळतात
अशा फाटलेल्या पानांच्या वह्या मिटून टाकायच्या असतात
अन नवीन आठवणींसाठी पुन्हा नव्याने ओळी सोडायच्या असतात

कोमल .......................१/८/१०