Total Pageviews

Monday, June 28, 2010

आतुरल्या या सरी ...

आतुरल्या या सरी मिलनास आता
का दरवळतो हा गंध.. का हा काळोख दाटला

तृषार्त मन माझे तुझ्याच सहवासाचे
नाही उरले भान आता मम अस्तित्वाचे

मोह मला तुझ्या रेशमी बाहूपाशांचा
सोसवेना मला मृदुगंध प्राजक्ताचा

दरवळलेली रात आता मुग्ध होऊन गेली
प्रेमाच्या सरींमध्ये चिंब भिजवून गेली

ठाऊक नाही तुला मज सांगावयाचे होते किती
पण मिठीत तुझ्या गुंग होते माझी मति

हलकेच स्पर्श होता तन शहारून गेले
मिलनास आतुरलेले मन बेहोष होऊन गेले

कोमल ...........................२८/६/१०

Sunday, June 27, 2010

मला न पंख हवे आहे ....

मला न पंख हवे आहे ....
हवे तेव्हा आभाळ कवेत घेण्यासाठी
मनाविरुद्ध घडल्यावर दूर जाण्यासाठी

मला न चांदण हवे आहे .....
हवे तेव्हा अंधारात पांघरण्यासाठी
हरवलेल्यांना वाट दाखवण्यासाठी

मला न वारा हवा आहे ......
कधीतरी वादळ होण्यासाठी
जुन्या आठवणी उध्वस्त करण्यासाठी

मला न पाऊस हवा आहे .....
सर्वांना चिंब भिजवण्यासाठी
कधीतरी आसवांना लपवण्यासाठी

कोमल ..................२७/६/१०

Saturday, June 26, 2010

आता लांबच राहायचं .......

ठरवलंय तुझ्यापासून आता लांब राहायचं
क्षणाक्षणाला तुझ्यापासून दूर जायचं

शब्दांनाही थोडस आता आवरत घ्यायचं
भावनांनाही आता कोंडून ठेवायचं

तुझ असण आता नसण मानायचं
उगाच तुझ्या विचारात नाही आता राहायचं

आठवणींना तुझ्या पुन्हा नाही काढायचं
जमेल तसं आता एकटच जगायचं

शक्य तेवढ आता स्वतःला मिटून घ्यायचं
आसवांना आता दडवूनच ठेवायचं
आता लांबच राहायचं ...........

कोमल ..........................२७/६/१०

Monday, June 21, 2010

आज विसरायचं ठरवल.........

मनात भरून राहिलेल्या गोष्टी आज सांडायच ठरवल
काहीही झाल तरी आज नियतीशी भांडायचं ठरवल

माझ्याच सावलीने आज साथ सोडायचं ठरवल
मग का उगाच मी माझंच मन तोडायचं ठरवल

हळुवार जपलेल्या आठवणींना आज विसरायचं ठरवल
खोलवर रुतलेल्या काट्यांना आज काढायचं ठरवल

रक्ताळलेल्या जखमांना आज बांधायचं ठरवल
हळुवार फुंकर घालून त्यांना शांत करायचं ठरवल

मनाला होणाऱ्या भासांना आज संपवायचं ठरवल
अंधारात स्वतःलाच शोधायचं ठरवलं

उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला आपलंस करायचं ठरवलं
हरवलेल्या गोष्टींना आज विसरायचं ठरवल

कोमल ......................२२/६/१०

Wednesday, June 16, 2010

आजचा देखावा....

नशिबाचाच हा एक भाग असावा
म्हणून आज माझ्यासोबत कोणीही नसावा ....

उगवलेला सूर्यही जसा रुसून बसावा
तसाच आहे आज हा मळभ देखावा ...

तुझ्या चाहुलीने जसा प्राजक्ताचा सडा पडावा
भास हा नेहमीच फसवा ठरावा ...

अंतरात जसा भावनांचा लोळ उठावा
तसाच आज हे आभाळ भरून यावा ...

मिटलेल्या पापण्यातून अश्रू जसा गाळावा
तसाच तो भरलेल्या आभाळात दाटलेला दिसावा ...

असाच काहीसा आजचा देखावा
उगाच मग तो नशिबाचा भाग भासावा ....

कोमल ...........................१६/६/१०

प्रीत अशीच धुंद असावी ....

मोह होईल अशी रात असावी
चांदण्या रातीत कोणाची तरी साथ असावी ...

हलकेच बोल अन हळुवार स्पर्शाची संवेदना असावी
मैत्री पेक्षाही त्यावेळी प्रेमाची भावना श्रेष्ठ ठरावी ...

चांदण्यांनी अशीच चादर पांघरावी
धुंद रातराणीने सेज सजावी ...

थंड वातावरणात त्याची ऊब असावी
न बोलताच जवळ घेणारी मिठी असावी ...

धुंद रजनीत मी मग्न होऊन जावी
प्रीतीत त्याच्या अशीच ती रात फुलावी ...

कोमल ........................१६/६/१०

Tuesday, June 15, 2010

हे जरुरी तर नाही.....

प्रत्येकालाच नशीब साथ देईल हे जरुरी तर नाही
प्रत्येकाच्याच मार्गात फुल उमलतील हे जरुरी तर नाही
प्रेम करूनही लोक ते व्यक्त करत नाहीत पण
प्रत्येकालाच इथे प्रेम मिळेल हे जरुरी तर नाही.....

माझ्या एकटेपणात मला कोणी साथ देईल हे जरुरी तर नाही
प्रत्येक आनंदाच्या क्षणी मित्रांची साथ लाभेल हे जरुरी तर नाही
वादळात साथ सोडणारे तर बरेच असतात पण
त्याच वादळातून बाहेर काढणारे कोणी भेटेल हे जरुरी तर नाही.....

प्रत्येक समुद्रात दीपस्तंभ आढळेल हे जरुरी तर नाही
प्रत्येक शिंपल्यात मोती मिळेल हे जरुरी तर नाही
कधीतरी त्याने म्हणावं ' अग वेडे मी तुझाच आहे' पण
प्रत्येक ऋतूत त्याची साथ लाभेल हे जरुरी तर नाही.....

कोमल .......................१५/६/१०

Sunday, June 13, 2010

अजूनही.......

शब्द शब्दात तुझे अस्तिव आज जपून आहे
श्वास श्वासात तुझी प्रीत तशीच आहे

मन मनात तुझी प्रतिमा झळकून आहे
दाट दाटलेल्या कंठात नाव तुझेच आहे

स्वर स्वरात तुझेच बोल गात आहे
नभ नभात व्यापलेले विश्व तुझेच आहे

भास भासात तुझाच साथ आहे
क्षण क्षणात अजूनही मी एकटाच आहे

कोमल ........................१३/६/१०

हळव्या मनास माझ्या......

हळव्या मनास माझ्या कसली खंत आहे
जे नाही सोबत त्यांचाच इंतजार आहे

उगाच उरी दाटलेले भाव डोळ्यात साठवत आहे
अन पावसात त्यांची वाट मोकळी करत आहे

का उगाच ते अजूनही घुटमळत आहे
का थांबायचं कुठे हे त्यास उमगत नाही आहे

रात्रंदिवस त्याला मी मानवत आहे
का उगाच गंधाळलेली स्वप्न सजवत आहे

जे नुसतेच भास ठरतात त्यांचा का इंतजार आहे
जे आपले नव्हतेच कधी त्यांच्यावर का रुसवा आहे

जे आहेत आपलेच ते अजूनही विश्वास जपून आहे
मग का उगाच मृगजळाची तुला आस आहे

कोमल ....................१३/६/१०

वाटलं नव्हत मला कधी....

वाटलं नव्हत मला कधी कधी असंही होत
लख्ख उन्हातही अचानक आभाळ भरून येत
मनात नसतानाही मग त्यात भिजव लागत

वाटलं नव्हत मला कधी कधी असंही होत
उगाच आठवणींच्या हिंदोळ्यावर मन कधी रमून जात
अन मग माणसांच्या गर्दीतही एकट होऊन जात

वाटलं नव्हत मला कधी कधी असंही होत
अंधाऱ्या आकाशात मन उगाच चांदण्या शोधत
मग चंद्र दिसला नाही कि रुसून बसत

वाटलं नव्हत मला कधी कधी असंही होत
डोळ्यात आसू अन ओठांवर हसू एकाच वेळी सांभाळाव लागत
मग त्या लपाछपीच्या खेळत स्वतःलाच कुठेतरी हरवाव लागत

कोमल .....................१३/६/१०

Sunday, June 6, 2010

भिजलेल्या चारोळ्या.......

कोसळताहेत मुग्ध सरी
जणू आभाळ फाटलंय कुठेतरी
सुटलाय गार गार वारा
भिजून गेली तृषार्त धरा

*******************

अशाच एका पावसाळी
भेट तुझी माझी झाली
स्मरल्या त्या आठवणी
आज पुन्हा भिजताना अशाच क्षणी

********************

आल्या या सरी
अशाच माझ्या दारी
अंगणसुद्धा भरले
फक्त त्यांच्या सुगंधाने

*******************

आताशा पावसात भिजण
सोडलंय मी
उगाच त्यात अश्रू लपवण
टाळतेय मी

*******************

नको म्हणतानाही
तो आला
अन मलाही त्यासोबत
भिजवून गेला

*******************

आपली ती जागा
आता एकाकी उरलीय
रोजच्या पावसात
एकटीच भिजतेय

*******************

कोसळल्या सरी आज पुन्हा
जागवल्या आठवणी जुन्या
अशाच पावसात भिजलेल्या
आणि नंतर त्यात वाहून गेलेल्या

********************

मी नाही पुन्हा पावसात जाणार
उगाच त्यात नाही भिजणार
कारण फक्त एवढेच मला
पुन्हा तुझी मग आठवण छळणार

********************

तुझ्या माझ्या नात्यात आता
अंतर वाढत चाललाय
जसा हा पाऊसही आता
हुलकावणी देतोय

********************

आभाळ भरून आल कि
मन माझ अस्वस्थ होत
तू सोबत नसल्याची
उगाच जाणीव करून जात

कोमल ...........................६/६/१०

Friday, June 4, 2010

असेही करावे लागते

दुसऱ्यांना हसवण्यासाठी
स्वतःचे दुःख लपवावे लागते

कधी त्यांचे अश्रू पुसण्यासाठी
आपल्यालाही त्यात भिजावे लागते

त्यांना सांभाळण्यासाठी
आपल्याला खंबीर व्हावे लागते

कधी त्यांचे मन जपण्यासाठी
आपल्या मनाला सावरावे लागते

त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी
आपले स्वप्न विसरावे लागते

त्यांना समजून घेण्यासाठी
कधी लहान तर कधी मोठे व्हावे लागते

तर कधी त्यांचे अस्तित्व जपण्यासाठी
आपल्याला स्वतःलाच विसरावे लागते

कोमल ......................४/६/१०

तुझ्याचसाठी .......

कधी जाणलेस तू ?
का अंधारात मी चंद्र शोधते ...
का शांततेतही मी अस्वस्थ होते....
का उगाच मी वात पाहते...
का माझ्याही नकळत मी अश्रू ढाळते...
का उगाच मी हास्य शोधते...
का पावसाच्या थेंबातही मी प्रतिबिंब शोधते....
का हरवलेल्या वाटा मी पुन्हा पुन्हा शोधते....
का सहजच मी देवाकडे मागणे मागते....
का अजूनही मी वळून पाहते....
का अजूनही मी वाटेत घुटमळते...
तुझ्याचसाठी सख्या तुझ्याचसाठी ........

कोमल ....................४/६/१०

Tuesday, June 1, 2010

काही उरलंच नाही ...

हरवायची आता काही भीती राहिली नाही
कारण गमावण्यासाठी आता काही उरलंच नाही ...

आजकाल डोळेही भरून येत नाही
कारण रडण्यासाठी आता अश्रूही शिल्लक नाही ....

कोणाशीही बोलावस वाटत नाही
कारण आता शब्दांनाही माझ्यासाठी वेळ नाही ....

आजकाल कोणालाही प्रश्न विचारत नाही
कारण त्यांची उत्तर माझ्याहीकडेही नाही ....

उगाचच जास्त डोक चालवत नाही
म्हणजे नंतर ते त्याच अस्तित्वही दाखवणार नाही ...

स्वप्नही आजकाल बघत नाही
म्हणजे ती तुटण्याचा त्रासही होणार नाही ...

नशिबाचे चटके कदाचित पुरे झाले नाही
म्हणून अजूनही मी अनवाणी चालायची सवय सोडली नाही ...

कोमल ...........................१/६/१०

आलास कशाला ?

जायचंच होत तर
आलास कशाला ?

वाटा बदलायच्याच होत्या तर
रस्त्यात गाठलस कशाला ?

उत्तर द्यायचीच नव्हती तर
मला प्रश्नात पाडलस कशाला ?

स्वप्न तोडायचीच होती तर
दाखवलीस कशाला ?

तुला तुझ्या मतांवर ठाम राहायचं नव्हत तर
मला माझ मत विचारलस कशाला ?

साथ सोडायचीच होती तर
सोबत तरी केलीस कशाला ?

नाती जपायचीच नव्हती तर
जोडलीस कशाला ?

दूरच ठेवायचं होत तर
जवळ तरी घेतलस कशाला ?

शेवटी रडवायचंच होत तर
हसायला तरी शिकवलस कशाला ?

कोमल .......................१/६/१०