Total Pageviews

Monday, July 12, 2010

आठवण तुझी....

चांदण्यात लपलेली रात्र खुलावी जशी
तशीच उजळली आज आठवण तुझी

पावसात भिजलेली हिरवळ जशी
तशीच हळवी सख्या आठवण तुझी

दडलेल्या पानातून कळी उमलावी जशी
तशीच फुलते प्रिया आठवण तुझी

आभाळाच्या पडद्यावर चित्र रंगवावी जशी
तशीच खुलून येते सख्या आठवण तुझी

लाजणाऱ्या त्या चंद्रात उजळते रात्र जशी
तशीच लाजते प्रिया आठवण तुझी

मिटलेल्या पापण्यात लपती आसव जशी
तशीच भिजवते सख्या आठवण तुझी

कोमल ......................१३/७/१०

No comments:

Post a Comment