Total Pageviews

Saturday, August 14, 2010

कधी मागितलं मी ....

कधी मागितला आयुष्याचा हिशोब मी
फक्त माझ्या शंभर प्रश्नांचे एक उत्तर तर मागितलं होत मी
निदान एकतरी इच्छा पूर्ण करायची होतीस ....

कधी मागितलं होत व्यापलेले आकाश मी
फक्त तुझ्या मुठभर हृदयात एक कोपराच तर मागितला मी
निदान तेवढी तरी हक्काची जागा द्यायची होतीस ....

कधी मागितले होते तुझे चोवीस तास मी
फक्त तुझ्या वेळेतील काही सेकंद तर मागितले होते मी
निदान तेवढा वेळ तरी काढायचा होतास ....

कधी मागितला होता बरसणारा पाऊस मी
फक्त तुझ्या आसवातील काही थेंब तर मागितले होते मी
निदान काही मोती तरी द्यायचे होतेस ....

कधी मागितला होता पसाभर फुलांचा सडा मी
फक्त तुझ्या काट्यानमधील एक पान तर मागितलं होत मी
निदान ओंजळभर तरी कळ्या द्यायच्या होत्यास ....

कधी मागितली होती नक्षत्राननी भरलेली रात मी
फक्त तुझ्या अंधारलेल्या वाटेवरल एक चांदण तर मागत होते मी
निदान एखादा काजवा तरी सोबत ठेवायचा होतास ....

कोमल ....................................१४/८/१०

No comments:

Post a Comment