Total Pageviews

Monday, August 16, 2010

कधी असंही करायचं असत ....

कमलपत्रावरील दवांना कधी धरायचं नसत
जे वाट बघतात आपली त्यांच्यासाठी थांबायचं असत

प्रत्येकवेळी मार्गातल्या काट्यांमुळे रडायचं नसत
वाटेतले अडथळे दूर सारून असंच पुढे चालायचं असत

येणाऱ्या संकटांना मुळीच घाबरायचं नसत
घोंगावणाऱ्या वादळालाही हिम्मतीने शमवायचं असत

हे माझ्याच नशिबी का अस कधी बोलायचं नसत
जे पडल आहे पदरात ते गोड मानून घ्यायचं असत

दिलेल्या वचनाला कधी मोडायचं नसत
घाबरलेल्या श्वासांना विश्वासाने जपायचं असत

ते तुझं हे माझं असं कधी करायचं नसत
दोघांनी मिळून एकमेकांना सावरायचं असत

कोमल ...........................१७/८/१०

No comments:

Post a Comment